आजच्या काळात अनेक गोष्टी नवीन घडताहेत. जुन्या पद्धती बाद होत चालल्यात. आधुनिक, अत्याधुनिक
आणि अती अत्याधुनिक होत चाललेल्या माणसांना साध्या साध्या गोष्टी मात्र कळेनाशा झाल्यात.
परवा मुलाच्या शाळेत मिटींगला गेले. पार्किंग लहान, त्यामुळे गाड्या जागा मिळेल तशा ठेवलेल्या. मी
गाडीजवळ पोहचले, तसे एक पालक मला म्हणतात, “आंटी, आप गाडी निकाल रहे हो क्या?” तो जवळपास
पन्नाशीच्या घरातला पुरुष होता. त्याने ‘आंटी’ म्हणावं, म्हणजे मी चाळीशीत सत्तरीची दिसतेय की काय, अशी
शंका माझ्या मनाला कुरतडू लागली. मला चैन पडेना. आंटी शब्द माझ्या डोक्यात, कानात, मनात घोळत
राहिला, अगदी त्या tv वरच्या जाहिरातीसारखा! बरं, माझे केसबिस काही पिकलेले दिसत नव्हते, मिटींगच्या
आधी मेंदिबिंदी लावून काळे केलेले होते. तरी आंटी! शेवटी धैर्य करून एका मैत्रिणीजवळ मन मोकळं केलं, तर
तिलाही असे अनुभव आलेले. ती एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरली असता तिथल्या एका हाउसकीपिंग
वाल्याने तिला ‘आंटी’ म्हटलं होतं. तोही तिच्यापेक्षा काही फार लहान नव्हता. तीही अशीच वैतागली होती.
तिसरी एक मैत्रीण किराणा दुकानात गेली असता तिथल्या पस्तिशीच्या नोकराने तिला आंटी म्हटलं तर चौथ्या
मैत्रिणीला एका हॉस्पिटलच्या wardboy ने. पाचव्या मैत्रिणीला एका बस कंडक्टरने आंटी म्हटलं, तर तिने
त्याला उतरताना ‘बेटा, मेरे 5 रुपये बाकी है”, म्हणून छोटासा सूड घेतला. कंडक्टर तिच्यापेक्षा मोठा दिसत
होता, तरी. एका मैत्रिणीला एक भाजीवाला नेहमी आंटी म्हणायचा. शेवटी तिने त्याला आजोबा म्हणायला
सुरुवात केली.
काय चाललंय हे? विवाहित बाई दिसली की तिला ‘आंटी’ म्हणायचं, हा जणू अलिखित नियम होत चाललाय.
स्त्रियांना वय विचारू नये, हा जसा शिष्टाचाराचा नियम आहे, तसा यासंदर्भात काही नियम करता येईल का?
अब्रूनुकसानीचा किंवा मानसिक छळाचा दावा दाखल करता येईल का? किमान एखादी जनहित याचिका तरी,
जनतेच्या आत्मसन्मानार्थ ? एका वकील मैत्रिणीला विचारलं तर केस उभीच राहू शकत नाही असं तिचं मत
पडलं. त्यामुळे तो बेत रहित करावा लागला.
मी जरा जास्तच चौकसपणे या विषयाचा मागोवा घ्यायला लागले, तेव्हा कळलं की पुरुषांनाही असं बरोबरीच्या
व्यक्तींनी काका वगैरे म्हटलेलं आवडत नाही. एका लहान मुलांच्या गाण्यांच्या रिअॅलिटी शो मध्ये पस्तिशीची
होस्टेस कम अँकर सहभागी मुलांच्या वडिलांना सतत ‘काका’ म्हणते तेही (त्यांनाच नव्हे तर आपल्यालाही)
खटकतंच ना?
मध्यंतरी वाचलेल्या एका आत्मचरित्रात त्या लेखकानेही आपल्याला ‘काका’ म्हटल्याचा कसा राग आला, याचं
वर्णन केल्याचं आठवलं. लेखक त्यावेळी चाळीशीत होता तर काका म्हणणारा तरुण नवविवाहित. मग लेखकाने
आपल्या मुलाला (वय वर्षे १०/१२) ‘त्या’ तरुणाशी बोलायला पाठवलं आणि आवर्जून ‘काका’ हे संबोधन
वापरायला लावलं. गंमत म्हणजे ‘काका’ हे संबोधन ऐकताच तोही चिडला!
यावर नुसता विचार करून चालणार नाही, कृती करायला हवी हे मनात ठरवून विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली.
‘तुम्ही ‘आंटी’ कुणाला म्हणता?’ या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर त्यांच्याजवळ नव्हतं. तरुण पिढी याबाबत
पुरती गोंधळलेली होती. ‘म्हणजे अशा जराश्या ओल्डर लेडीज असतात ना, त्यांना.’ हे एकाचं उत्तर. (आता ‘अशा
जराश्या ओल्डर’ म्हणजे काय यांवर ‘अशा नसतात का थोड्याफार ओल्डर’ यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मिळू
शकलं नाही.) दुसरा उत्तरला, ‘मॅरीड लेडीज म्हणजे ‘आंटी’!’ (त्याच्या वर्गमैत्रिणीचं तीन महिन्यांनी टी वाय ची
परीक्षा झाल्यावर लग्न होतं. ती हे ऐकून चित्कारली, ‘अय्या, सच्या, तू तीन महिन्यांनी मलापण ‘आंटी’
म्हणणार?’) तिसऱ्याने सरळसरळ शरणागती पत्करत मलाच विचारलं, ‘खरंच म्याडम, कुणाला म्हणायचं हो
‘आंटी’?’ यावर मी ‘अरे, तुमच्या मित्राच्या आईला किंवा तुमच्या आईच्या वयाच्या कुठल्याही बाईला ‘आंटी’
म्हणता येईल.’ असं उत्तर देताच पुढला प्रश्न आला, ‘बाकीच्यांना काय म्हणायचं?’ मग मी वयानुसार, वैवाहिक
स्थितीनुसार, त्या स्त्रीशी असलेल्या आपल्या नात्यानुसार, ज्या ठिकाणी (कॉलेज/देऊळ/घर इ.) ती भेटली त्या
जागेनुसार ‘बेटा’, ‘ताई’, ‘वहिनी’, ‘काकी/आत्या/आंटी’, ‘आजी’ ही संबोधने कशी वापरावीत यावर एक छोटंसं
बौद्धिक घेतलं. (विदर्भात ‘मावशी’ नि कोल्हापुरात ‘मामी’ ही संबोधनेदेखील आदरार्थी वापरतात हेही आवर्जून
सांगितलं.) आणि अगदीच समोरच्या सुकांत चंद्राननेचं वय समजतच नसेल, तर ‘मॅडम’ हे संबोधन आहेच, हेही
जोडलं. ह्याच चालीवर पुरुषांनाही ‘दादा, भाऊ, काका, मामा, आजोबा’ यापैकी कुठलं संबोधन केव्हा निवडावं
आणि प्रसंगी ‘सर’ हे ‘एव्हरग्रीन’ संबोधन कसं खुबीने वापरावं, हेही सांगितलं. पुलंच्या ‘ती फुलराणी’ मधली
खेडवळ मंजुळा ‘हा’ प्रश्न कसा कौशल्याने सोडवते, “(पुरुष) पिकल्याला आसला की ‘रामभाव’ नि तरना आसला
की ‘वसंतराव’! ” हे ऐकून मुलांनाही मजा वाटली.
कृतकृत्य झाल्याच्या आनंदात मी वर्गाबाहेर पडले. कॉरिडॉर मधून चालत असताना मागून आवाज आला, ‘आंटी,
एफ वायचा क्लास कुठला? मी नवीन जॉईन झालेय ना, त्यामुळे माहिती नाही मला.’

No comments:
Post a Comment