"साहेब, आम्हाला कर्जमाफीची भीक नकोय, फक्त आमच्या मालाला योग्य भाव हवाय."
"5 वर्षांपूर्वीचा अस्वच्छ भारत आता चकाचक होत चाललाय."
"बाई, गावाकडे माझ्या आईला शौचालय बांधून मिळालं, काहीजणांना घरं मिळाली. लई खूष हायती ते लोक!"
"अरे साहेब, यांना पैसे खायला मिळत नाहीत ना मनासारखे, म्हणून वैतागलेत, दुसरं काही नाही. "
"बाबू,याच्या पणजोबांपासून आम्ही त्यांच्यासोबत काम करीत आलो. आमचा दुसरीकडे पहायचा काही सवालच नाही."
"समजायला लागलं, तेव्हापासून शाखेत जातोय, एकनिष्ठता अंगी बाणवली गेलीय."
"खुप आशेने ,अच्छे दिन येतील, म्हणून मतदान केलं होतं साहेब, पण घोर निराशा झाली "
"सगळे साले एकजात चोर आहेत, मी कधीच मतदान करत नाही. आपल्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. मी तर मस्त फॅमिली सोबत ट्रीप ला चाललोय "
"मी यावेळेस NOTA ला मतदान करणार! "NONE OF THE ABOVE ".आपण सुशिक्षीतांनी हे करायला हवं, नुसतंच योग्य उमेदवार नाहीत, असा ओरडा करण्यात काय अर्थ? "
NOTA विषयी थोडेसे--
2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदा NOTA पर्याय मतदारांना मिळाला. 1.1%मतदान झाले.
NOTA हा पर्याय आणण्याचा मुख्य उद्देश होता की जे मतदार मतदान करीत नाहीत, त्यांना मतदानास प्रोत्साहित करणे. कारण त्यांनी मतदान न केल्यास,बोगस मतदान व्हायचे, ते टाळण्यासाठी!
What is the power of NOTA?
If you vote for NOTA,your vote goes into dustbin.
उमेदवाराच्या हारजीतमध्ये काही फरक पडत नाही.
उदाहरणार्थ :10 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
5 - NOTA
3 - party A
2 - party B
तर पार्टी A ही जिंकणार.
मग NOTA ला मत देऊन काय उपयोग?
जर जास्त टक्के लोकांनी NOTA ला मत दिले, तर research होऊ शकतो की असं का घडतय? निवडणूक रद्द ठरवली जाऊ शकते, उमेदवार black list मध्ये जाऊ शकतात.आणि त्यामुळे सर्व पक्षांना चांगले उमेदवार उभे करणे भाग पडू शकते.
आता NOTA मध्ये तशी power नाहीये. (निकाल ठरविण्याच्या दृष्टीने ) पण भविष्यात ही एक फार मोठी power ठरू शकते.
18 एप्रिल जवळ येतीय ,
तेव्हा,
चला, चला, चला. ........
सखूबाई,सोनूबाई ,
मतदानाला चला. .......
उतू नका,मातू नका,
घेतला वसा (मतदानाचा )टाकू नका. ....
चला, चला, चला .....
मतदानाला चला!
No comments:
Post a Comment