Sunday, February 2, 2020

आमची मालुताई

मालूताई ,ही खर तर माझी मावशी ! पण आम्ही कधीच तिला मावशी म्हंटल नाही .आई ,मामा तिला मालूताई म्हणायचे ,त्यामुळे सगळेच ,तिचे भाचे ,पुतणे मालूताई म्हणायला लागले. तिची नातवंड सोडली तर सगळ्यांची ती मालूताई होती.आणि खरच एखाद्या मोठ्या ताई सारख तीनी आमचा BJP(बापट ,जोशी,परांजपे) परिवार सांभाळला.
गोरा रंग ,नऊवारी पातळ, शांत,सोज्वळ, प्रसन्न चेहरा अस तिच व्यक्तिमत्व होत.
सतत कामात राहण्याचा तिचा स्वभाव!सुना येईपर्यंत, चौघ मुल ,घर, दुकान सगळा व्याप सांभाळायची .घराखालीच किराणा दुकान असल्याने व्यापही खुप होता .दुकानात विकायला श्रीखंड ,बेसनाचे लाडू,चिवड़ा ,शेव करण कड़धान्य भिजत टाकण असे अनेक काम असायचे .आचारी असला तरी लक्ष दयावच लागायच.अन त्यात भर म्हणुन प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा बहिणीचा मुक्काम तिच्याकडे असायचा.पण तिला मी कधीही रागावलेल पाहिलं नाही।  उलट घरी  सगळी मुलं असल्याने आमचे  तिथे लाडच  व्हायचे। लहानपणी मी रडकी होते आईला सोडून राहायचे नाही ।पण आम्ही नागपूरला आलो की ती  आईला जबरदस्ती सिनेमाला पाठवायची आणि मी  कितीही  त्रास दिला तरी ," अग काही त्रास दिला नाही तीनि तू उगीचच म्हणतेस "अस ही वर म्हणायची .आमचे  सगळ्याचे लग्न ठरवण्यातच नाही तर ते सुरळीत पार पाडण्यात तिची महत्वाची भूमिका होती.बर हे प्रेम फ़क्त आमच्यापुरत मर्यादित नव्हतं तर पुढे आमच्या मुलांवरही तिनी तेवढच प्रेम केल.तनु MD च्या क्लासेस साठी  नागपुरला जायची ,तेंव्हा जर तनु च्या आवडीची भाजी नसेल तर लगेच तिच्यापुरती आवडीची भाजी करुन द्यायची ,अन  ते पण तिच्या  वयाच्या 82 वर्षी! कुठून येत असेल हा उत्साह ! प्रेम आणि आपलेपणा मनातुन असेल तिथेच हे होऊ शकत.उगीच नाही 
चार मुल, सुना ,नातवंड यांची इतकी वर्ष  एकत्र मोट बांधून ठेवणयात ती यशस्वी झाली!

नवीन गोष्टी सहजतेने आत्मसात करण्याचा तीचा स्वभाव होता. होमिओपॅथी च थोडं बहुत ज्ञान तिला होत,छोट्या मोठ्या आजारावर तीच आम्हाला औषध देत असे।  आम्हा सगळ्यांचे कानही जन्मानंतर (अन गरज पडेल तेंव्हा तेंव्हा) तिनेच घरी टोचले!तिचे शिक्षण 10 पर्यन्त पण व्यावहारीक ज्ञान मात्र एखाद्या व्यापारयाला लाजवेल अस होत.दुकाना चे सगळे हिशोब तीच ठेवायची।कंप्यूटर आल्यावर  तीनि लगेच शिकुन घेतल व त्यावर हिशोब ठेवण सुरू केलं।

आत्ता वीणा वर्ल्ड बरोबर भूतान ला गेली होती ,तिथल्या रैंप वॉक साठी जीन्स टॉप ,सलवार सूट खरेदी केले होते,वेस्टर्न मधे ति इतकी सहज वाटत होती कि हीच का नेहमी नऊवारी नेसनारी मालू ताई ,असा प्रश्न पडावा.
आजी गेल्यावर  तिचे सगळी नऊवारी मालूताई ला दिले होते त्यातल्या एक नऊवारी   च्या काठाला अस्सल चांदीची तार होती.ते नऊवारी फ़ाटल्यावर त्याची तार काढून ,तिनी  चांदीचे छोटे लोटी भांड बनऊन आम्हा सहा बहिणीना  दिले ,जेंव्हा की आम्हाला त्या नऊवारी  बद्दल काहीहि माहिती नव्हतं .आज जिथे भाऊ भाऊ इस्टेटी साठी एकमेकांशी  भांड़तात त्या पार्श्वभूमीवर तीच हे वागण तिला वेगळयच ऊंचीवर नेऊन ठेवत. 
तीन नातींची लग्न झाली (अजुन तिघि रहिल्यात) दोन नातसुना आल्या ,पणतु झाला अश्या सर्वार्थने फुलत जाणाऱ्या संसाराची तृप्ति मालूताई दादांच्या चेहऱ्यावर बघण हा एक आनंददायी अनुभव होता.पण ...
दुर्दैवाने भूतान ट्रिप तिची शेवटची ट्रिप ठरली.भूतान हुन निघायच्या दिवशी ति आजारी पडली ,पूर्ण पिवली पडली होती ,काविळ असेल अस वाटलेल तिच दुखण लिवर कैंसर निघाल .तिला शेवटपर्यंत कैंसर झालाय हे सांगितल नव्हत ,पण माझ्यामते तिला थोड़ी बहुत कल्पना आलीच असेल.वय 87 असल्याने केमो सहन झाल नसत ,त्यामुळे ताप आला की एन्टीबियोटिक दे ,पोट दुखल पेन किलर दे ,ईतपत च उपचार शक्य होते .4- 5 ऑक्टोम्बर पासून ति अंथरुणाला ख़िळली .2 महीने खुप त्रास झाला.सतत कामात असणारी मालूताई अशी बेड वर पडलेली बघण सगळ्यासाठी खुप धक्कादायक होता. 26 dec.ला  साकेत ,अन 1 jan.ला रुजुता च लग्न होता ,तिला त्याबद्दल खुप उत्सुकता होती ,मी भेटायला गेले तेंव्हा तिला बोलताना पण थकवा येत होता ,म्हणुन मला म्हणाली  तूच बोल अन सांग संगीता कड़े लग्नाची  काय काय  तयारी सुरु आहे ते. या दोन्ही लग्नासाठी तिच रिजर्वेशन झाल होत  अन दोन्ही कड़े तीचा सक्रिय सहभाग असता ,पण दुर्दैवाने ति येऊ शकणार नव्हती .शेवटी शेवटी तर त्रास खुपच वाढला ,पोटात सारख पाणी व्हायला लागल पोट दुखायच ,दु:खाने सारखी कंन्हायची.या काळात घरच्या सगळ्यानीच तिची मनापासून सेवा केली आरती अभय च विशेष कौतुक! ,25 dec,  तर खुप सीरियस झाली होती पण तिची इच्छाशक्ति जबरदस्त असावी  दोन्ही लग्न सुरळीत पार पडेपर्यंत  कॅन्सर च्या राक्षसाला  थोपऊन धरल,26 च लग्न तर पार पडल पण कॅन्सर ने पोखरलेली तिची अशक्त कुड़ी किती काळ तग धरणार ! 1 jan.सकाळी 2.30 ला तिचे देहावसान झाले।अर्थात आम्ही सगळे लग्न घरी असल्याने ही बातमी लग्न पार पडल्यावर संध्याकाळी आम्हाला सांगितली. आज न उद्या ही बातमी येणार हे माहित होता पण तरी प्रत्यक्षात बातमी ऐकल्यावर मात्र,कोणीच ते सहन करू शकल नाही.वयाच्या 87 व्या वर्षी पर्यन्त सतत कार्यरत असणारी मालुताई आजारी पडते काय अन तीन महिन्यात  काळाच्या पडदया आड़ जाते काय ,सगळच अनाकलनीय आहे.

28 dec.ला तीचा वाढदिवस होता ,त्यादिवशी तिची सगळे नातावंड नागपुरला जमले होते , सगळ्यांना तीनी गिफ्ट  दिली ,अन पराग बरोबर मुम्बई ला आम्हा सगळ्या बहीणींसाठी सोन्याची चेन पाठवली.ही तिची कृति ,ती आमच्यावर तिच्या मुलां -नातावडांन एवढंच प्रेम करायची याचा परत एकदा पुरावा देऊन गेली.
हे प्रेम पुढच्या पिढीतही असच राहिल अशी मला खात्री आहे.
22 Dec. ला तीच वर्षश्राद्ध झालं.अजूनही तीच जाण खर वाटत नाही.🙏

No comments:

Post a Comment