अक्षरा

मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे? त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?

Labels

अंजली अर्चना अश्विनी नवी सखी भाग्यश्री मधुमती माणिक मीनल मेधा मोहिनी वर्षा श्रुती सीमा स्वाती

Friday, July 5, 2019

माझा सखा

पावसाच्या आगमनाचा सोहळा अनिमिष डोळ्यांनी बघत गॅलरीत बसले होते. कॉंक्रिट च्या जंगलाच्या पलिकडल्या टेकड्या पावसाच्या सहस्त्र धारांमुळे धुसर झाल्या होत्या. फक्त जलधारा आणि जलधारा बघणे नेत्रसुखद होतं. अशावेळी छानशा गाण्याची सोबत असली तर निसर्गाचा हवाहवासा वाटणारा सहवास अजून बहारदार होतो. असचं एक निसर्गावरील सुंदर गाणं आठवलं. रेडिओ वर ऐकलेले आणि मोबाइल मध्ये रेकॉर्ड केलेलं ते गाणं शोधून ऐकायला लागले आणि  अकोल्याच्या रेडियो सेटची खूप आठवण आली. (DTH - Direct to Home) माझ्या आईदादांनी  मला भेट दिला आहे. नुसता दिला नाही तर टेक्निशियन आणून लावून पण दिला. टेक्निशियन ने बर्‍याच हुलकावण्या दिल्या होत्या येतो म्हणायचा आणि यायचाच नाही. नेमका आला तर भुरभुर पाऊस पडत होता. आलाच आहे तर पावसामुळे का परत पाठवा असा विचार करून त्या रेडिओ ची डिश लावायला टेक्निशियन बरोबर दादा पण छत्री घेऊन गच्चीवर गेले होते. स्वतः जातीने हजर राहून ती डिश बसवून घेतली. अशी भावनात्मक गुंतवणूक असल्याने त्या रेडिओ ची अनिवार आठवण झाली.
रेडिओ ऐकणे माझा छंद तर आहेच पण आता आवश्यकता वाटायला लागली. रेडिओ लावून काम करण्यात खरचं खूप मजा येते. कामाचा थकवा जाणवत नाही, मन प्रसन्न राहतं. त्याच्या कडे डोळे लावून बसावे पण लागत नाही. आपले काम पण होते विनासायास. व्हिडिओकॉन चे मोठे चांगले स्पिकर त्या रेडिओ ला लावले होते त्यामुळे साऊंड क्वालिटी पण मस्त होती.
 रेडिओ बिचारा पॅकिंग मध्ये गुंडाळून ठेवला आहे. नव्या जागेत रुळण्यात माझे रेडिओ ऐकणे बाजूलाच पडले. मोबाईल मध्ये गाणं ऐकताना अकोल्याचे घर, रेडिओ ची जागा सगळे प्रकर्षांने आठवले आणि मोबाइल मध्ये डाऊनलोड केलेला AIR रेडिओ लगेच ऐकायला सुरुवात केली तोच जो मी सतत ऐकायची
एकदम फ्रेश झाले. माझा प्रिय सखा खूप दिवसांनी भेटला. मनातले नकारात्मक विचार, उदासीनता, ताणतणाव सर्व हा सखा अगदी अलगद दूर करतो आणि आपल्याला चांगले ठिकाणावर आणतो. "त्रिवेणी" तर 15 मिनीटात जीवनाचं सार सांगतं. जगायल बळ देतं एक विषय घेऊन त्याला अनुसरून थोडक्यात निवेदन आणि योग्य, समर्पक गाण्याचे एखादे कडवे अस त्याचा ढाचा असतो. आपण मात्र समाजातील प्रश्न, अडचणी, दुःख, त्रास, नैराश्य विसरतो आणि पुन्हा नव्याने सकारात्मक उर्जा आपल्यात निर्माण होते. अनेक दिवसांचा माझा अनुभव तरी असा आहे. 
वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन चे टायटल साँग पण अगदी गाण्यासारखे गुणगुणायला भाग पाडतात. F. M. Gold, F. M. रेनबो, मराठी अस्मिता वाहिनी, विविध भारती हे काही forever green रेडियो स्टेशन्स! प्रत्येक चॅनल चे आपले असे identical titles आहे. आजच्या भाषेत tag line... जसे "देश कि सुरेली धडकन - विविध भारती." "ज्ञान आणि मनोरंजनाची तुमच्या आमच्या सर्वांची आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी" इत्यादी.
रेडिओतील न पाहिलेल्या सख्यांचे आणि सखांचे आवाज ऐकून मन कसं आनंदित झालं. त्या आवाजाशी आता खूप घट्ट मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे, 'रेडिओ जॉकी' हा शब्द फारच थीटा आणि औपचारिक आहे. रेडिओ सखी किंवा आप का अपना दोस्त असं म्हणणारे रेडिओ सखा हे कसे ह्रदयाच्या  जवळचे वाटतात.
इतके दिवस काय मी गाणे ऐकलेच नाही की काय? इतके रुक्ष, निरस आयुष्य जगत होते का मी? तर नाही, टिव्ही, सीडी प्लेअर मुलं लावतातच. शिवाय ती अलेक्सा आहेच हुकूमाची ताबेदार! आपण म्हणू ते गाणं दुसर्‍या क्षणी लावून आपल्या सेवेत हजर असते. पण आपण सांगू ते गाणं ऐकण्यापेक्षा रेडिओ वर अचानक भेटलेलं गाणं जास्त आनंद देवून जातं. त्या गाण्याच्या वेळी जर काही आठवणी असतील तर त्या पण आपोआप येऊ लागतात. लक्षात ठेवून किंवा आठवून आठवून गाणी लावणे तसे अवघडच पण रेडिओद्वारे आपल्याला आयतेच गाणे लावून मिळतात. कधी कधी तर एकामागोमाग इतकी छान छान गाणी ऐकायला मिळतात कि दिल खूष हो जाये.
कधीकधी एखादा विषय घेऊन त्यावर गाणी सुरू असतात. उदाहरणार्थ पाऊस. सणवारानुसार, प्रसंगानुरूप कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने गाणी. माहिती चा खजिना आहे रेडिओ! ती सगळी माहिती, दिनविशेष असं सतत श्रोत्यांना नवनवीन देत असतो. एखाद्या चांगल्या पुस्तकाचे क्रमशः वाचन कधी अभिवाचन, छोटीशी नाटिका सादर केली जाते. "आणि दोन हात" डॉ. वि. ना. श्रीखंडे यांचे अतिशय सुरेख पुस्तक मी रेडिओ वर  क्रमशः ऐकून विकत घेऊन  पुन्हा वाचलं. हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी गाण्यांच्या निर्मितीत श्रोत्यांसाठी, रसिकांसाठी वरदानच ठरली आहे. अनेक चांगले चांगले गीतकार, संगीतकार, गायक इत्यादि कलाकार या देशात सतत घडत आहेत आणि त्या त्या पिढीला आनंदाचा ठेवा देत आहे. कोणा एकाचं नावं घ्यावं? इतके अगणित आहेत. अगदी चाळीस च्या दशकापासून तर थेट आत्ता पर्यंतची अनेकविध गाणी रेडिओवर ऐकता येतात. मुलाखती, भाषणं नानाविध कार्यक्रम काय काय सांगावे?
टिव्ही नव्याने आले तेव्हा वाटले आता रेडिओ लोकं विसरतील आणि कालबाह्य होईल. पण झाले अगदी उलटे. कितीही नवेनवे गॅझेट्स येऊ देत, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कितीही क्रांती येऊ देत रेडिओ ची लोकप्रियता अखंड, अबाधित राहणार हे नक्की. उलट नव्या तंत्रज्ञानामुळे लहान थोरांना रेडिओ मोबाइल मध्ये ऐकणे अधिक सोयीस्कर झाले आहे. आणि रेडिओ ची लोकप्रियता आणखी वाढली. देशाच्या पंतप्रधानांनाही देशातल्या जनतेशी हितगुज करायला रेडिओने भुरळ घातली. देशाच्या कानाकोपऱ्यात रेडिओ पोहचला पूर्वीही होता तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने रेडिओचे रूप अजूनच निखरले. चौकट राजा या चित्रपटाच्या गाण्यात थोडासा बदल करून... 'हे जीवन सुंदर आहे, रेडिओमुळे सुरेल आहे....'

अंजली



P
at July 05, 2019
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: अंजली

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Labels

अंजली अर्चना अश्विनी नवी सखी भाग्यश्री मधुमती माणिक मीनल मेधा मोहिनी वर्षा श्रुती सीमा स्वाती

पाण्यासारखेच, वाहते सदाचे आयुष्य नावाचे, खुळे गाणे

My photo
अक्षरा
View my complete profile

इथे लिहिणार्‍या अक्षरा सख्या

  • अंजली
  • अर्चना
  • अश्विनी
  • नवी सखी
  • भाग्यश्री
  • मधुमती
  • माणिक
  • मीनल
  • मेधा
  • मोहिनी
  • वर्षा
  • श्रुती
  • सीमा
  • स्वाती

आजवरचे लेख

  • ►  2022 (21)
    • ►  July (2)
    • ►  June (2)
    • ►  May (2)
    • ►  April (5)
    • ►  March (2)
    • ►  February (4)
    • ►  January (4)
  • ►  2021 (32)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (3)
    • ►  September (1)
    • ►  August (4)
    • ►  July (3)
    • ►  June (3)
    • ►  May (3)
    • ►  April (4)
    • ►  March (5)
    • ►  February (2)
  • ►  2020 (73)
    • ►  December (3)
    • ►  November (2)
    • ►  October (3)
    • ►  September (4)
    • ►  August (4)
    • ►  July (3)
    • ►  June (6)
    • ►  May (5)
    • ►  April (13)
    • ►  March (12)
    • ►  February (11)
    • ►  January (7)
  • ▼  2019 (136)
    • ►  December (7)
    • ►  November (8)
    • ►  October (8)
    • ►  September (8)
    • ►  August (12)
    • ▼  July (9)
      • पाऊस सृजनाचा
      • Mission Admission -"या भाऊ इकडे भूत आहे तिकडे"
      • सिनकर सर
      • दोष ना कुणाचा..
      • सेल्फी
      • HOME SWEET HOME
      • स्मरणक्षण
      • माझा सखा
      • आला आषाढ!
    • ►  June (13)
    • ►  May (6)
    • ►  April (13)
    • ►  March (15)
    • ►  February (15)
    • ►  January (22)

लेख शोधा..

  • Home
अक्षरा. Awesome Inc. theme. Powered by Blogger.