गणपतीस्तोत्र म्हणून झाल,आकडे मोजून झाले,पाढे१९ चा सुद्धा म्हणून झाले पण निद्रादेवी काही प्रसन्न होईना .पण डोक्यातल्या राक्षसाने डोक वर काढू नये म्हणून ,दहावीच्या वर्गातल्या मैत्रीणी आठवायला सुरवात केली ७५ टक्के आठवल्या.सहजच शिक्षक आठवायला लागले. मुळेबाई, या नावावर गाडीअडली,आणि जाणवल आपल्या आजपर्यंतच्या शालेय जीवनात ह्या नावाशी फारच जवळच नात आहे.
. मुळेबाई, पायान अधु, गोऱ्या,ठेगण्या, दात थोडेसे पुढे ,लांबआकाराचाचेहरा ,अविवाहित,स्वभाव थोडासा.खडुस ,माझ्यावर त्यांचा विशेष लोभ,नाकरिकशास्त्र शिकवायच्या ,त्या ७व्या वर्गाच्या वर्गशिक्षिका होत्या ,दर महिन्यात हजेरीबुकात नाव लिहून घ्यायच्या अक्षर चांगलना आमच! माझेकडून ,काम पूर्ण झाल की, शाब्बासकी द्यायच्या .त्या वर्षी शाळेत गँदरिंगला मत्स्यगंधा नाटक बसवण चाल होत ,मी आणि जयश्री या नाटकात होतो, मला पहिला आणि शेवटचा अंकातच काम होत. दुसऱ्या अंकाची प्रँक्टीस सूरु झाली की,मी वर्गात जात असे ,एकदा ऐनवेळी पहिल्या अंकाचीच तालीम करायची ठरली., जयश्री मला बोलवायला आली,.त्यावेळी मुळे बाईंचा पिरेड सुरु होता. तिने बोलावल्याचा निरोप दिल्यावर ,त्या रागातच तिला म्हणाल्या ,
अग स्वतः पिरेड करतच नाहीस तिला तर करू दे . तिने जाऊन राजेबाईंना सांगितल, दुसऱ्या दिवशी फतवा निघाला नाटक होईपर्यंत कुणीही तासिकेला जाणार नाही. ह्या पहिल्या मुळेबाई माझ्या शालेय जीवनातल्या,.
पुढे शिक्षण झाल, लग्न झाल, नोकरी लागली. पुन्हा एकदा शालेय जीवन सुरु झाल, यावेळी सुध्दा मुळेबाई होत्याच.
भरतकाम, वीणकाम, वाचन , भरपूर बोलण आणि हसण ,खाण याची मनापासून आवड असलेल्या विज्ञान शिक्षिका, हसऱ्या चेहऱ्याच्या ,शरीरान स्थूल.पण,एकदम अँकटीव्ह ,स्वभाव कडक पण प्रेमळ ,स्टाफमध्ये सिनीयर, समजावयाच्या, रागवायच्या लगेच प्रेमाने बोलायच्या ,अन्याय खपायचा नाही . विद्यार्थीप्रिय. त्याच्याकडून भरपूर शिकायला मिळाल. वेगवेगळे किस्से ,वाचलेल्या पुस्तकाच कथानक सांगायच्या . तब्येतीच्या कुरबुरीपाई सेवानिवृती.घ्यावी लागली .आम्हा दोघींच जरा ज्यास्तीच गुळपीठ होत. फोनवर भरभरुन बोलायच्या , अर्धापाऊण.तासाची निश्चिंती ,वेळ आणि बोलण्याच्या पध्दतीवरुनच सासुबाई म्हणायच्या मुळेबाई आहेत वाटत.
२००८साली ज्युनीयर कॉलेजला ईतिहास साठी आलेल्या आरती मूळे ,पहिल्या दिवसापासूनच यांची नि माझी छान गट्टी जमली, वयान लहान ,गोऱ्या ,उंच कविता करणाऱ्या ,विद्यार्थिनींच्या लाडक्या आम्ही दोघी नेहमीच बरोबर रहात असू. मनमोकळ बोलणाऱ्या .
..... मी मुख्याध्यापक झाल्यावर निरोपाच्या समारंभात माझा परिचय करुन देतांना माझ्यावर छानशी कविता करणाऱ्या.
.निवडश्रेणी प्रशिक्षणात अनेक वर्ष मी तज्ज्ञ म्हणून होते पण स्त्री शिक्षिका मी एकटीच .२०१४-१५च्या प्रशिक्षणाला माझे बरोबर सहकारी म्हणून आली ती सीमा मुळे. पुन्हा मुळेच.राष्ष्ट्रीय टिळक हायस्कूलची MSc. गणित Phd. हुशार, विविध उपक्रम.राबणारी मदतीला सदैव तयार असलेली.हिच्याशीही छान गट्टी जमली.
मुख्याध्यापक झाल्यावर माझी पुर्वाश्रमीची वसमतकर आम्ही एकाच शाळेत शिकलो, बी.एड.पण बरोबरकेल ती रंजना मुळे , तुझ्या प्रेरणेने पद स्वीकारल , कुठलही काम करतांना आधी कस करायच ,अग अस झाल आता काय करु असा सल्ला मागणारी . मुळेबाई.
अशा या पंच मुळेबाई .
विद्यार्थ्यांचा विचार केला तेव्हा लक्षात आल ,मुळे आडनावाचे अनेक विद्यार्थीसुध्दा आहेत त्यातले काही आजही संपर्कात आहेत.
मुळे आडनावाशी आपला जवळचा नात आहे
झोप येत नव्हती म्हणून केलेल्या युक्ती मधून हा नवीन शोध लागला.
सेंकड ईनिंग सुरु झाली त्यातही कुणी मुळेबाई येतात का याची मी वाट.पहाते आहे.
कल्पना कोलारकर ,अकोला
No comments:
Post a Comment